नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ६७७ झाली आहे. गुरुवारी (दि. २०) १७ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ६, ग्रामीणमधील नऊ आणि मालेगावातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ८८२ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ९०३ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामध्ये नाशिक शहरात ५६०, ग्रामीणमध्ये २७३, तर मालेगावात ५५ आणि जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २२ हजार ९२५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे.ग्रामीण पोलीस दलात चौथा बळीग्रामीण पोलीस दलात कार्यरत ५४ वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दलात कोरोनाने आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे, तर शहर पोलीस दलातील एकास कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. मुख्यालयात कार्यरत या सहायक पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबातील व्यक्ती बाधित आढळून आली. त्यातून त्यांना लागण झाली. सद्यस्थितीत ग्रामीण पोलीस दलात नऊ कर्मचारी बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १०० हून अधिक पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.गुरु वारी जिल्ह्यात १ हजार ४३० संशयित रु ग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक १ हजार ११७रु ग्ण नाशिक शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७४५ बाधितांचा मृत्यू झाला तर ४ हजार बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५९२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील येवला आणि दिंडोरीयेथे अनुक्रमे ३ आणि ८ बाधित आढळून आले आहेत. येवला तालुक्यात १२ संशयितांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतल्या. यात तिघांचे पॉझिटिव्ह तर ९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिंडोरी तालुक्यात दोन दिवसात आठ नवे रु ग्ण आढळून आले आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पाशर््वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू शकते अशावेळी नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत डिस्टन्स बाळगणे खूप गरजेचे आहे.
जिल्ह्यात ८८२ रुग्ण ठणठणीत बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:29 AM
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ६७७ झाली आहे. गुरुवारी (दि. २०) १७ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ६, ग्रामीणमधील नऊ आणि मालेगावातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ८८२ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ९०३ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले.
ठळक मुद्देकोरोना : ९०३ नवे रु ग्ण आढळले; १७ जणांचा झाला मृत्यू