ठळक मुद्देबाधितांच्या संपर्कातील 75 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठवले
येवला : शहरासह तालुक्यातील 9 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तालुक्यातील अंदरसुल व सायगाव येथील दोघा संशयितांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल रविवारी, (दि. 13) पॉझिटिव्ह आले असून शनिवारी, (दि. 12) उशीरा अंदरसुल येथील 5 तर शहरातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक रूग्णालयातून 3 तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून एक असे एकूण 4 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील 75 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठवले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.