शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

अंबोली शिवारात ९ लाखांचा माल हस्तगत ; अवैध मद्यासह चारचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 7:46 PM

अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यासह ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईअंबोली शिवारात अवैध मद्यासह चारचाकी जप्तप्लास्टिक पिश्व्यांमधून मद्याची तस्करी

नाशिक : अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यासह ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भरारी पथकाने शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास नाशिक जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंबोली फाटा शिवारात एका चारचाकी कारमध्ये (जी.जे-१५ सीए-६८६३) केवळ दादरा-नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी परवानगी असलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे विदेशी मद्य ३१ प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये आढळून आले. त्याचप्रमाणे २१६ बाटल्या, व्हिस्कीच्या ७५० मिलीलिटर क्षमतेच्या ३६ प्लॅस्टिक पिशव्या, १५०० मि.ली. क्षमतेच्या ६० प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. या प्रकरणी संशयित प्रियंक बिपीनभाई पटेल (३०, रा. सुरत) यास ताब्यात घेण्यात आले आहे. मद्यसाठ्यासह चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकातील निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक अरुण सूत्रावे, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, सहायक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे, जवान सर्वश्री श्याम पानसरे, धनराज पवार, वीजेंद्र चव्हाण व अनिता भांड यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. अधिक तपास निरीक्षक मधुकर राख करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी