शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

२९ पैकी नऊ जागांवरच अनुकूलता?

By admin | Published: January 29, 2017 1:02 AM

भाजपा सर्वेक्षण : विष्णू सावरांची परीक्षा

गणेश धुरी : नाशिकभारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ‘मिशन-४१’चे टार्गेट ठेवले असून, त्यातील बहुतांश गट हे अनुसूचित जमाती संवर्गातून निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या खांद्यावर या २९ अनुसूचित जमाती गटांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; मात्र त्यातील अवघ्या नऊ गटांतच पक्ष भक्कम स्थितीत असल्याचे खुद्द भाजपाच्याच सर्वेक्षणातून उघड झाल्याची चर्चा आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिका व जिल्हा परिषद यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्यासाठी विविध प्रकारच्या व्यूहरचना आखल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते यांच्या खांद्यावर नाशिक महापालिका, तर दुसरे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्यावर नाशिक जिल्हा परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातही जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी अनुसूचित जमाती संवर्गातील २९ गटांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्याची जबाबदारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी पुढील काही दिवस आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा नाशिकलाच मुक्काम ठोकणार आहेत. एकीकडे हे केले जात असतानाच दुसरीकडे भाजपाच्या वतीने ७३ गटांचे तसेच २९ अनुसूचित जमाती संवर्गातील गटांचे सर्वेक्षणही करण्यात आल्याचे कळते. या सर्वेक्षणानुसार अनुसूचित जमाती संवर्गातील २९ पैकी नऊ जागा ए-प्लस (विजय निश्चित), १४ जागा ए (विजयाच्या समीप), ५ जागा बी (विजयासाठी संघर्ष) आणि २ जागा (विजय अनिश्चित) अशी वर्गवारी करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना या ए, बी व सी संवर्गातील जागांवर जरा जास्तीच मेहनत घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.