लोकमत न्युज नेटवर्कयेवला : शहरातील ९ संशयीतांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून २ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान सायगाव येथील ६० वर्षीय बाधित मिहलेचा शुक्र वारी (दि. ११) रात्री मृत्यू झाला आहे.शहरातील नागपुरे गल्ली भागातील ३८ वर्षीय पुरूष, १० व १७ वर्षीय मुल, ४६ व २७ वर्षीय महिला, साई बिल्डर कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष, गंगादरवाजा भागातील ५९ वषीय पुरूष, जहांगीर कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, एनडीसीसी कॉलनीतील (रेल्वेस्टेशन) ३२ वर्षीय महिला यांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. हे सर्व अहवाल खाजगी लॅबकडील आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयातून अंदरसुल येथील ४७ वर्षीय व आडगाव चोथवा येथील ४१ वर्षीय बाधित पुरूष कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, १९ संशयीतांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत आहेत.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५१२ झाली असून आजपर्यंत ३८४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ९० असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
येवल्यात ९ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 7:43 PM
येवला : शहरातील ९ संशयीतांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून २ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान सायगाव येथील ६० वर्षीय बाधित मिहलेचा शुक्र वारी (दि. ११) रात्री मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देबाधित महिलेचा मृत्यू ; २ कोरोनामुक्त