शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

खासगी वाहतुकीच्या सोयीसाठी नाशिक मनपा करते 92 टक्के खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 8:38 AM

वाहतूक सुधारणा हा नव्या शहरीकरणात परवलीचा शब्द ठरला असला तरी नाशिक महापालिका एकूण वाहतूक व्यवस्थेतील खासगी वाहतूक या एकाच घटकावर तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते.

संजय पाठक/नाशिक - वाहतूक सुधारणा हा नव्या शहरीकरणात परवलीचा शब्द ठरला असला तरी नाशिक महापालिका एकूण वाहतूक व्यवस्थेतील खासगी वाहतूक या एकाच घटकावर तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते. वाहतूक क्षेत्रात काम करणा-या एका आघाडीच्या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे रस्ते हे प्रामुख्याने खासगी वाहनांच्या वापरासाठी असतात आणि फुटपाथ किंवा सायकल ट्रॅक सारख्या सर्वसामान्यांशी निगडीत सोयींवर जेमतेम २० कोटी रूपये देखील खर्च होत नाही.

देशातील नाशिकसारख्या अनेक शहरांची वाहतूक व्यवस्था आता निर्णायक टप्प्यावर उभी आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही व्यवस्था पूर्णत: ढासळली जाऊ शकते. किंवा प्रयत्न केले तर शहराच्या वाहतूक नियोजनातून कायापालट केला जाऊ शकतो. परंतु एकूणच अशा शहरांचे पालक संस्था असलेल्या महापालिकांमध्ये यासंदर्भात पुरेसे गांभीर्य नसते. रस्ते विकास केला तर वाहतूक सुरळीत होईल. पर्यायी मार्ग उपलब्ध होतील असे साधे गणित त्यासाठी मांडलं जात असतं. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना शहरात पादचारी आहेत. सायकल चालवणारा वर्ग आहे, याचे कधीही भान राखलेले दिसत नाही.

भारतातील एकूणच शहरांचा विचार केला तर त्यातील पालक संस्था म्हणजे महापालिकांच्या अंदाजपत्रकात बांधकाम विभागासाठी मोठी तरतूद असते. त्याअंतर्गत रस्ते साकारण्यावर मोठा भर दिला जात असतो. रस्ते हे प्रामुख्याने वाहतुकीसाठी असले तरी त्याचा वापर खासगी वाहतुकीसाठी अधिक होत असतो. सार्वजनिक वाहतूक कमीच असते. परंतु देशातील एकूण शहरांचा विचार केला तर किमान ६० ते ७० टक्के रक्कम ही खासगी वाहनांच्या सोयीची असते. तर २० ते २५ टक्के रक्कम ही पदपथासाठी असते. असे आयटीडीपी या संस्थेच्या पाहणीत आढळले आहे. नाशिकच्या बजेटमध्ये तरतूद असून उपयोग नाहीनाशिक महापालिकेचे महासभेने फुगवलेले अंदाजपत्रक काहीही असले तरी आयुक्तांच्या माध्यमातून साकारण्यात येणा-या वस्तुस्थितीकडे जाणा-या अंदाजपत्रकाचा विचार केला तर ते साधारणत: १४०० ते १५०० कोटी रूपयांचे असते. त्यातील २५ टक्के रक्कम ही वाहतुकीच्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्त्यांसाठी खर्च होते. त्याचा विचर केल तर तब्बल साडे तीनशे कोटी रूपये होतात. नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत क्षीण आहे. एसटी महामंडळ बस फे-या बंद करीत आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येने अशा सेवांवर परिणाम होत असतानाही महापालिका रस्त्यावरील या वाहतुकीसाठी खर्च करते. खासगी वाहतुकीवर ९२ टक्के खर्चनाशिक शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली असली तरी मुळातच शहरातील ४० टक्के प्रवाशांच्या खेपा खासगी वाहनांनी होतात. तर ६० टक्के कामासाठी नागरीक बहुतांशी चालताता किंवा सायकल, बस, रिक्षाचा वापर करतात. मात्र याचा विचार केला तर खासगी वाहनांच्या सोयीसाठी महापालिका तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते. नाशिक महापालिकेने मनात आणले तर सार्वजनिक व्यवस्था सुधरू शकते. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. हा भाग वेगळा असला तरी एवढ्या रकमेतून ५० ते ६० किलो मीटरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पदपथ किंवा सायकल ट्रॅक साकारले जाऊ शकतात असे आयटीडीपीचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTravelप्रवासNashikनाशिक