अशोक बिदरी -
मनमाड ( नाशिक ) : येत्या काळात येणाऱ्या सण उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ९० प्रवासी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ऐन सण उत्सवात प्रवाशांची होणारी गैरसोय टळणार आहे.
मध्य रेल्वेने यापूर्वीच मुंबई ते सुरत दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे. दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष आणि नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल चालवल्या जाणार असल्याचे म्हटले आहे (तपशील मध्य रेल्वे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्वी जारी केलेले प्रसिद्धी पत्रक).
आता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर/मडगाव, पुणे - दानापूर/अजनी/करमळी आणि पनवेल - करमळी दरम्यान अतिरिक्त ३४ होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान ६ होळी विशेषची घोषणा केल्यामुळे, या वर्षी घोषित होळी विशेषची एकूण संख्या ९० इतकी आहे.