नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी गतवर्षापासून ‘फ्रंटलाईन’वर राहून कोरोनाशी दोन हात करत आहेत. आयुक्तालयातील सात पोलीस कर्मचारी कोरोनाशी लढताना दुर्दैवाने मृत्यूमुखीही पडले. यामुळे कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलिसांनाही प्रथम दिली जात आहे. आयुक्तालयातील ९० टक्के पोलिसांचे कोरोनाच्या पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
राज्याचे पोलीस दल गतवर्षी मार्चपासून आतापर्यंत कोरोनाशी दोन हात करत रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे लॉकडाऊनची अंमलबजावणी तर दुसरीकडे कायदा, सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावताना पोलिसांचेही आरोग्य धोक्यात आले. पोलिसांनाही कोरोनाचा विळखा हळुहळू पडू लागला होता. कोराेनाबाधित पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयांच्या खेपा माराव्या लागत होत्या. यामुळे त्यांचे कुटुंबीयही चिंताग्रस्त झाले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच, सर्वप्रथम आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासह कोरोनाची भीती दूर करण्यावर भर दिला. त्याकरिता हक्काचे पोलीस कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरच्या उभारणीने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला.
कोरोनाची लस आल्यानंतर पहिला डोस दुसऱ्या टप्प्यात पोलिसांना देण्यास सुरुवात झाली. यानंतर आयुक्तालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
---इन्फो---
५० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला पोलिसांनीही कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. केवळ गरोदर व बाळंतीण महिला पोलीस कर्मचारी वगळता अन्य महिला पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुमारे ५० टक्के महिला पोलिसांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
---इन्फो---
१० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसदेखील टोचून घेण्यास सुरुवात झाली आहे. १० तारखेपासून पोलिसांच्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६ अधिकारी व १५५ अंमलदारांनी कोरोना लसीचा दुसरा डोसदेखील पूर्ण केला आहे. येत्या काही दिवसांतच ९० टक्के पोलिसांचे दुसऱ्या डोसाचे लसीकरणही पूर्ण होणार आहे.
------
आलेख---
---
शहरात एकूण पोलीस - ३,०९८
लस घेतलेले अधिकारी- १७४
लस घेतलेले अंमलदार- २,३५१
----
फोटो आर वर १८व्हेरिफिकेशन फॉर पोलीस डमी नावाने फॉरमेट सेव्ह.
१८डोस नावाने फोटो आर वर
===Photopath===
180321\18nsk_28_18032021_13.jpg
===Caption===
लसीकरण