नाशिक : मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाºया नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ७९६ पोलिसांसह १९ होमगार्ड आणि राज्यराखीव दलाच्या बाधित सर्व जवानांनी कोरोनावर यशस्वी विजय मिळविला. दुर्दैवाने परिक्षेत्रात १० कोरोनायोद्धा पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद घेत सेवा बजावणाºया पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी वर्गालाही कोरोनाला सामोरे जावे लागत आहे. परिक्षेत्रातील एकूण पाच जिल्ह्णांत सेवा बजावत असताना कोरोनाची पोलिसांना लागण झाली. सर्वाधिक ३३३ पोलीस नाशिक ग्रामीणमधील मालेगावात बंदोबस्तावर असताना बाधित झाले. त्यापैकी ३०६ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, २७ पोलीस उपचारार्थ दाखल आहेत. दुर्दैवाने पाच पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्णाच्या पोलीस दलालाही कोरोनाचा जबर फटका बसला. एकूण २७७ पोलीस बाधित झाले. त्यापैकी २२४ पोलिसांनी कोरोनावर मात केली, तर ५३ पोलीस उपचार घेत आहेत. याच जिल्ह्णात १६ होमगार्ड आणि ७५ राज्य राखीव दलाचे जवानही कोरोनाग्रस्त झाले होते. त्यापैकी दोन होमगार्डचा अपवाद वगळता सर्व जवान कोरोनामुक्त झाले आहे.अहमदनगर जिल्ह्णातसुद्धा २३६ पोलिसांसह एक जवान व पाच होमगार्ड कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी २०४ पोलीस व सर्व होमगार्ड कोरोनामुक्त झाले, तर तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळे जिल्ह्णात ४८ पोलीस बाधित झाले त्यापैकी ४० पोलीस कोरोनामुक्त झाले, तर नंदुरबार जिल्ह्णात ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी २२ पोलिसांनी कोरोनाला हरविले.सुदैवाने धुळे व नंदुरबार जिल्ह्णात एकाही कोरोनाबाधित पोलिसाचा आतापर्यंत मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत परिक्षेत्रात कोरोनाबाधित १२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि दोन होमगार्ड यांच्यावर उपचार सुरू आहे.नाशिक ग्रामीणने गमावले पाच योद्धेनाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले. त्यापैकी पाच पोलीस हे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहे. ग्रामीण पोलिसांनी लॉकडाऊन काळात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात दिवसरात्र चोख बंदोबस्त देत मालेगावाला कोरोनामुक्त करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मालेगावकरांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा रस्त्यावर २४ तास पहारा होता.
नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 1:13 AM
मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाºया नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ७९६ पोलिसांसह १९ होमगार्ड आणि राज्यराखीव दलाच्या बाधित सर्व जवानांनी कोरोनावर यशस्वी विजय मिळविला. दुर्दैवाने परिक्षेत्रात १० कोरोनायोद्धा पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले.
ठळक मुद्दे१० बळी : ७९६ कोरोनामुक्त, मालेगावी सर्वाधिक प्रभावित; आरोग्य विभागाचे प्रयत्न