नाशिक : आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवशी शटल बसेस आणि जिल्ह्याबाहेर धावणाऱ्या बसेसच्या माध्यमातून सुमारे ९५० प्रवाशांनी प्रवास केला. तालुक्यातून शहरात येणाºया बसेसला चांगला प्रतिसाद मिळाला तर परजिल्ह्यात जाणाºया प्रवाशांची वाट पाहाण्याची वेळ आली.कोरोनामुळे ठप्प असलेली एस.टी. महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सेवा गुरुवार (दि.२०) सकाळपासून सुरू झाली मात्र पहिल्या दिवशी महामंडळाला प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागली. सकाळी ६.३० वाजता महामार्ग स्थानकातून कसाºयासाठी पहिली बस धावली. त्यानंतर अध्यार्तासाने पुणेकडे दुसरी बस रवाना करण्यात आली. जूने सीबीएस स्थानकात तालुक्यातील बसेस सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेहºयावर आनंद दिसून आला.या बसेसला बºयापैकी गर्दीदेखील झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ ७ बसेस सोडण्यात आल्या. पुणे आणि मुंबईकडे जाणाºया बसेसला मात्र पुरेशी प्रवासी संख्या लाभली नाही. दिवसभरात केवळ २० बसेसच्या माध्यमातून केवळ २५७ प्रवाशांनी प्रवास केला. तालुक्यातून शहरात येणाºया बसेसला दुपारनंतर प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले.दिवभरात धावल्या ५० बसेसजिल्हांतर्गत तसेच जिल्ह्णाच्या बाहेर अशा सुमारे ५० ते ५५ बसेस दिवसभर धावल्या. या बसेसच्या माध्यमातून ८६७ प्रवाशांनी प्रवास केला. तालुकांतर्गत शटल बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक होती. तर अन्य जिल्ह्यात केवळ २५७ प्रवाशांनी प्रवास केला.
पहिल्या दिवशी ९५० प्रवाशांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:05 AM
आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवशी शटल बसेस आणि जिल्ह्याबाहेर धावणाऱ्या बसेसच्या माध्यमातून सुमारे ९५० प्रवाशांनी प्रवास केला. तालुक्यातून शहरात येणाºया बसेसला चांगला प्रतिसाद मिळाला तर परजिल्ह्यात जाणाºया प्रवाशांची वाट पाहाण्याची वेळ आली.
ठळक मुद्देतालुका बसेस फुल्ल : जिल्ह्याबाहेर धावल्या २० बसेस