--इन्फो--
६१,६४४ मजूर बसने पोहोचले मूळ गावी
गावी पायी निघालेल्या मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर सोडण्याचे आदेश राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला केले होते. विशेषत: नाशिमधून जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असल्याने नाशिक जिल्ह्याने नियोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार इगतपुरी, नाशिक, पिंपळगाव बसवंत, मालेगाव या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे पिकअप पॉइंट तयार करण्यात आले होते. या ठिकाणाहून मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषांवर सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सुमारे ६१,६४४ प्रवासी मजुरांना मुख्यत्वे मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमारेषेपर्यंत सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास दररोज १०० ते १५० बसच्या फेऱ्या करण्यात आल्या.
---इन्फो--
मजुरांचे झाले स्किल मॅपिंग डाटाएन्ट्री
कोरोनाच्या कालावधीत निवारागृहात असलेल्या मजुरांची माहिती गोळा करण्यात आली. त्यामुळे मजुरांचा डाटा तयार होऊ शकला. निवारागृहातील सर्व व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येऊन त्याबाबतची डाटा एन्ट्री स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून करण्यात आली. सदर संगणक प्रणालीमध्ये सर्व मजुरांचे स्किल मॅपिंगबाबतही डाटा एंट्री करण्यात आलेली होती. ---इन्फो--
१ मे रोजी धावली पहिली मजूर रेल्वे
नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आलेली हाेती. मात्र त्यांचा आग्रह गावी जाण्याकडे होता. त्यामुळे केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार परराज्यात अडकलेल्या मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेने त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलीत राज्यात पहिली विशेष रेल्वे १ मे २०२० रोजी मध्य प्रदेश व दुसरी विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. नाशिक रोड स्थानकातून पहिली श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. जिल्ह्यातील इतर भागांतील मजुरांना बसच्या माध्यमातून नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. राज्यातील श्रमिक रेल्वे सोडण्याचा पॅटर्न नाशिकमध्येच उदयास आला. इतर जिल्ह्यांनी याच धर्तीवर विशेष श्रमिक रेल्वेचे नियोजन केले.