नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास 80 टक्के पेक्षा अधिक ठरला असून सातत्याने विसर्ग गोदावरी केला जात आहे धीरज जून महिन्यापासून अद्यापपर्यंत या बंधाऱ्यातून मराठवाड्याच्या दिशेने तब्बल 98 हजार 123 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
नाशिक शहरात पावसाची मुसळधार अद्याप सुरू नसली तरी जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाने लावली आहे या हंगामात जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी 695 मिलिमीटर पर्यंत पोहोचले आहे. सध्या दारणा, भावली या धरणांमधून विसर्ग सुरू आहे तसेच पावसाचे पाणीही वरील तालुक्यांतून वाहून या बंधाऱ्यात येत आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर असून रविवारी 16 हजार क्यूसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला होता.
दारणा धरण 90 टक्के भरल्याने या धरणातून 12 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. 1जूनपासून अद्याप दारणामधून 43 हजार 276 क्यूसेक इतके पाणी पुढे नदीपात्रात वाहून गेले आहे. एकूणच पावसाच्या हंगामाच्या या तीन महिन्यात मराठवाड्यात नाशिकच्या धरणांमधून मोठया प्रमाणात पाणी पोहचले आहे. यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ होण्यास नक्कीच मदत झाली आहे.
नाशिकमधील भावली 110 टक्के, दारणा 91 टक्के, गंगापूर 77 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 73 टक्के, वालदेवी 71 टक्के, कडवा 87 टक्के इतके भरले आहेत. उर्वरित धरनांचा जलसाठा 60 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. नाशिकमध्ये रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 24 तासांत सरासरी 23 मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. यामध्ये इगतपुरीत 81, सुरगाण्यात 70, पेठमध्ये 53, त्र्यंबकेश्वरला 51 मिमी इतका पाऊस मोजला गेला. गंगापूर धरण 90 टक्के भरल्यानंतर यामधूनसुद्धा विसर्ग केला जाण्याची श्यक्यता आहे. सध्या नाशिक शहरात पावसाचा जोर कमी असल्याने गोदावरीला अद्याप या हंगामात लहान पूरसुद्धा आलेला नाशिककरांनी बघितला नाही. मागीलवर्षी याच महिन्यात नाशिककरांनी महापूर अनुभवला होता.