नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे. या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास ८० टक्यापेक्षा अधिक भरला असून सातत्याने विसर्ग गोदावरीत केला जात आहे. जून महिन्यापासून अद्यापपर्यंत या बंधाºयातून मराठवाड्याच्या दिशेने तब्बल ९८१२३ क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.नाशिक शहरात पावसाची मुसळधार अद्याप सुरू नसली तरी जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाने लावली आहे. या हंगामात जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी ६९५ मिलिमीटर पर्यंत पोहोचले आहे. सध्या दारणा,भावली या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाचे पाणीही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यांतून वाहून या बंधाºयात येत आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर असून रविवारी १६ हजार क्यूसेस विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. दारणा धरण ९० टक्के भरल्याने या धरणातून १२००० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. १ जूनपासून अद्याप दारणामधून ४३२७६ क्यूसेस इतके पाणी पुढे नदीपात्रात वाहून गेले आहे. एकूणच पावसाच्या हंगामाच्या या तीन महिन्यात मराठवाड्यात नाशिकच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी पोहचले आहे. यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ होण्यास नक्कीच मदत झाली आहे.नाशिकमधील भावली ११० टक्के, दारणा ९१ टक्के, गंगापूर ७७ टक्के, नांदूरमध्यमेश्वर ७३ टक्के, वालदेवी ७१ टक्के, कडवा ८७ टक्के इतके भरले आहेत. उर्वरित धरणांचा जलसाठा ६० टक्क्यांपेक्षा कमी आहेत. नाशिकमध्ये रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासांत सरासरी २३ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. यामध्ये इगतपुरीत ८१, सुरगाण्यात ७०, पेठमध्ये ५३, त्र्यंबकेश्वरला ५१ मिमी इतका पाऊस मोजला गेला. गंगापूर धरण ९० टक्के भरल्यानंतर यामधूनसुद्धा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
नांदूरमधमेश्वरमधून ९८ हजार क्यूसेस पाणी मराठवाड्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 2:42 PM
नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे. या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास ८० टक्यापेक्षा अधिक भरला असून सातत्याने विसर्ग गोदावरीत केला जात आहे. जून महिन्यापासून अद्यापपर्यंत या बंधाºयातून मराठवाड्याच्या दिशेने तब्बल ९८१२३ क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.
ठळक मुद्देहंगामी एकूण विसर्ग : जूनपासून पाणी सोडण्यास प्रारंभ