शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

नाशिकच्या २९ वर्षीय जवानाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

By अझहर शेख | Published: March 19, 2023 11:05 AM

ते भारतीय सेनेच्या ५४ अरमाड बटालियनमध्ये कर्तव्यावर होते. 

नाशिक : येवला तालुक्यातील जवान अजित गोरख शेळके (२९) यांचा राजस्थानमध्ये श्रीगंगानगर येथे अपघातात मृत्यू झाला. ते भारतीय सेनेच्या ५४ अरमाड बटालियन मध्ये कर्तव्यावर होते. कर्तव्य आटोपून क्वार्टरकडे परतताना युनिटमध्ये त्यांचा अपघात झाला. यामुळे शेळके यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांचे पार्थिव आज रविवारी रात्रीपर्यंत येवला तालुक्यातील त्यांच्या मूळ मानोरी गावात दाखल होण्याची श्यक्यता असल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.सोमवारी सकाळपर्यंत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यविधी होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहचताच मानोरी बुद्रुक गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेळके यांच्या पश्चात वडील पत्नी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सकाळपासूनच त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक व हितचिंतकांनी सांत्वनासाठी गर्दी केली होती.

भूजबळांकडून शोकयेवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असं म्हणत माजी मंत्री छगन भूजबळ यांनी शोक व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिक