संजय पाठक
नाशिक- दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे समृद्धी मार्गावरील टोल नाका मनसैनिकांनी फोडला होता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये या टोल फोडणाऱ्या मनसैनिकांचा नाशिकमध्ये येऊन सत्कार केला त्याचबरोबर टोल फोडत असतानाच्या प्रसंगाचे छायाचित्र असलेला एकही यावेळी कापण्यात आला. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मनसेचे युवा नेते अहमदनगर येथून मुंबईला जात असताना अमित ठाकरे यांची गाडी टोल नाक्याजवळ अडवल्यानंतर फास्ट्रॅग द्वारे पैसे जमा झाल्यावरही टोल कर्मचाऱ्यांनी गाडी तांत्रिक कारणाने अडवून धरली त्यावरून वाद झाले होते. त्यानंतर नाशिकच्या मनसैनिकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन हा टोलनाका फोडला होता या घटनेनंतर अमित ठाकरे बुधवारी अचानक नाशिकमध्ये दाखल झाले त्यांनी टोल फोडणाऱ्या मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसेच अन्य मनसैनिकांचा सत्कार केला याचवेळी टोल फोडण्याचे छायाचित्र असलेल्या असलेला केकही कापण्यात आला. मनसेचे शहराध्यक्ष आणि टोल फोडल्याच्या प्रकरणातील आरोपी दिलीप दातीर यांचा दोन दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी वाढदिवस होता त्याचे औचित्य साधून हा खास केक कापण्यात आला.
विशेष म्हणजे तोडफोडीचे चित्र असलेल्या या केकवर... 'हा फक्त ट्रेलर होता योग्य वेळ आल्यावर पिक्चरपण दाखवू ' असे लिहिलेले होते.दरम्यान टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढली असून ती सहन केली जाणार नाही असे अमित ठाकरे यांनी सांगितले.