अशोक बिदरी -मनमाड (नाशिक) : इंदूर-पुणे राज्य महामार्गावर दुपारी तीन वाजताच्या सुमारास मालेगावहून मनमाडकडे येणाऱ्या बॉयलर बाटलाने (हाड्रोजन) भरलेल्या मालवाहू गाडीला अपघात झाला. कानडगाव फाट्याजवळ टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटली. यानंतर गाडीला आग लागली.
या मालवाहू गाडीत जवळपास ३०० बॉयलर बाटला भरलेले होते. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी झालेल्या स्फोटामुळे सिलिंडर अक्षरशः हवेमध्ये रॉकेटसारखे उडाले. मात्र या भीषण अग्नी तांडवामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन जवळपास चार किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिलताच अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.