नाशिक : शहरातील मानेनगर रासबिहारीरोड भागातील एका भंगार दुकानाचा मालक स्वत:जवळ धारदार कोयता बाळगताना पोलिसांना आढळून आला असून पोलिसांनी दुकानदाराला अटक करून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. या प्रकरणाच पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा गुंडविरोधी पथकाला सोमवारी (दि.१०) मानेनगर येथील एस ,बी ट्रडर्स या भंगारच्या दुकानातील दुकानदार धारदार कोयता स्वत:जवळ बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी मानेनगर येथील भंगार दुकानाच्या परिसरात सापळा लावून संशयित नदीम रफिक शेख (३२, रा. हरि मंजील, द्वारका) याला अटक केली. त्यावेळी त्याच्या हातात एक धारदार कोयता मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी संशयिताविरोधात पोलिस आयुक्तांच्या शस्त्र मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहीते. पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, दादाजी पवार, राजेश सावकार, सुनील आडके, कैलास चव्हाण , प्रदीप ठाकरे, दिनेश धकाते, संदीप आंबरे, बाळासाहेब सोनकांबळे, सचीन पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडत संशयित नदीम शेख याच्या मुसक्या आवळल्या आहेत.