शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

शेतात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

By धनंजय वाखारे | Published: September 08, 2023 1:31 PM

गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू झाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता.

संजय देवरे , देवळा (नाशिक) : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा रविंद्र नामदास ह्या १ल्या इयत्तेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी दि.७ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

   खामखेडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय खामखेडासह परिसरात मेंढीपालन करून उदरनिर्वाह करतात. पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात तात्पुरता स्वरूपात पाल मांडून ते कुटुंबियांसह राहत होते.

गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू झाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता.नेहमीप्रमाणे रानात मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान नामदास कुटुंबिय वाड्यावरील मेंढ्या आवरत असतांना रविंद्र पंडित नामदास यांना त्यांचा सहा वर्षाचा मुलगा केदा रवींद्र नामदास हा बराच वेळ न दिसला नाही. त्याच्या कुटुंबियांना त्याची आजूबाजुच्या परिसरात शोधाशोध केली असता तो शेजारीच शेतात पावसाचे पाण्याने भरलेल्या खड्डयात बुडालेला सापडला, त्याला उपचारासाठी त्वरीत देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासून त्याला मृत घोषित केले असता त्याचे आईवडिलांसह नातेवाईकांनी एकच आकांत केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.