नाशिक - उंटवाडी रस्त्यावर चौफुलीपासून पुढे काही अंतरावर एका भरधाव मोटारीने (एमएच ०१ एई ९८१०) दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना बुधवारी (दि.२८) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमोल रंगनाथ बुरकुले (३७), असे जखमीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे गस्तीपथक घटनास्थळी दिला. पोहोचले होते. या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. मोटारीत काही प्रमाणात रोकडदेखील असल्याची चर्चा आहे. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मोटार ओढून अंबड पोलिस ठाण्यात नेली, तसेच मोटारचालकालाही ताब्यात घेतले आहे. मोटारीत असलेल्या रोकडीतील नोटा चलनी आहेत की बनावट, हे समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थे होता, गाडीतील मागच्या सीटवर एक बॅग होती. त्या बॅगेतच २००० आणि ५०० च्या नोटा होत्या, त्या नोटा कुठून आल्या, खऱ्या की खोट्या याचा तपास सुरू आहे.