लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : १९ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून, मृत व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जोडीला बनावट आधार कार्ड बनवून देणारी तहसील कार्यालयातील टोळी अस्तित्वात असल्याचा पुरावा या निमित्ताने उपलब्ध झाला आहे. यामुळे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवºयात आले आहेत.तहसील कार्यालयात दलालांची टोळी? विठ्ठल साखरचंद मोरे (मृत्यू २००१) यांचा मुलगा पंडित विठ्ठल मोरे याला विठ्ठल मोरे बनवल्याचे आधार कार्डवरून स्पष्ट होते. हे बनावट आधार कार्ड वापरून सन २०१९ मध्ये जमीन कल्पना कैलास बावणे यांना विकण्यात आली. अनेक पुरावे आणून दिले व तहसीलमध्ये वारंवार चकरा मारल्या तरी आधार कार्ड मिळत नाही. कारण कार्डचे दर ठरलेले असतात याची उदाहरणामुळे पुष्टी मिळाली आहे. तसेच या कार्यालयात दलालांची टोळी सक्रि य असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. या व्यवहारात साक्षीदार म्हणून असलेल्या व्यक्तीच्या सह्या उपरोल्लिखित शासकीय कार्यालयातील अनेक दस्तावेजात आढळून येत असतील तर त्यामागची कारणे व परिस्थिती यांचा शोध घेतल्यास सत्य उजेडात येण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. एरवी नगर भूमापन कार्यालयात चकरा मारल्याशिवाय एकही कागद पुढे सरकत नाही. प्रस्तुत प्रकरणात सिटी सर्व्हेला नोंद देखील पटकन झालेली आढळून येते. तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय असो की नगर भूमापन कार्यालय या कार्यालयांच्या अधिकारीवर्गावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घातलेल्या धाडीच्या नोंदी चाळल्या तरी पुरेसे व्हावे.
‘त्या’ मृत व्यक्तीचे आधार कार्डही बोगस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:44 PM
नांदगाव : १९ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून, मृत व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जोडीला बनावट आधार कार्ड बनवून देणारी तहसील कार्यालयातील टोळी अस्तित्वात असल्याचा पुरावा या निमित्ताने उपलब्ध झाला आहे. यामुळे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवºयात आले आहेत.
ठळक मुद्देनांदगाव दस्तावेज प्रकरण : दुय्यम निबंधकसह सिटी सर्व्हे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात