नाशिक- पांझरापोळ येथील 825 एकर वरील वृक्ष संपदा नष्ट करून त्या ठिकाणी उद्योगासाठी जागा देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांचे पुतणे आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे.
नाशिक शहरालगत चुंचाळे शिवारात
पांझरापोळ ट्रस्टच्या मालकीची ही जागा असून या ठिकाणी सुमारे अडीच लाख झाडे असून दीड हजार गाईंचे संगोपन देखील केले जाते. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात ही जागा उद्योगांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली त्यानंतर उद्योग मंत्री उदय सावंत यांनी यासंदर्भात मुंबईत घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही जागा उद्योगांसाठी देण्यास विरोध केला आहे त्या संदर्भात आज मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आता त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही जागा उद्योगांसाठी देण्यास विरोध केला आहे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही जागा देण्यास विरोध केला आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा असताना अशा प्रकारची जागा केवळ वाईट हेतूने उद्योगांसाठी देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे हे अत्यंत चुकीचे आहे सध्याच्या असंविधानिक सरकारने अनेक ठिकाणी लाखो वृक्ष तोडण्याचे काम सुरू केल्याचेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.