दरम्यान, अवैध दारू विक्री थांबविण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असल्याचा बचाव करताना पोलिसांनी जेव्हा जेव्हा या बाबतीत कळविण्यात येईल तेव्हा तेव्हा पोलीस कारवाई करतील असे आंदोलकांना लेखी स्वरूपात कळविले. अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध सेवन त्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आपले गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर आतापर्यंत एकूण ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या निवेदनात दिली आहे.
----------------
नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात येथील पोलीस स्थानकाबाहेर आम आदमी पार्टीचे विशाल वडघुले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करताना कार्यकर्ते उपस्थित होते. (२६ नांदगाव १)
260821\26nsk_24_26082021_13.jpg
२६ नांदगाव१