नाशिक : अंगणवाडी सेविकांवर जिल्हाभर करण्यात येत असलेली लाईन लिस्टिंगच्या कामाची सक्ती तत्काळ बंद करावी, थकीत मानधन तत्काळ मिळावे, पाच ते सहा वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम मिळावी यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.दुपारी काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर यावेळी घोषणा देण्यात आल्या. संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्णात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन न देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, २०१३-१४ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचा देय असलेला भत्ता देण्यात आलेला नाही. योजनेच्या कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदराचे हजारो रुपये खर्च केले आहेत. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By admin | Published: March 07, 2017 1:01 AM