सटाणा : महाराष्ट्र राज्यातून सटाणा नगरपालिकेने सादर केलेल्या आरम नदीच्या संवर्धन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली असून, हा सटाणा तालुक्यातील पहिलाच प्रकल्प असून, यासाठी १५ कोटी रु पयांची मंजुरी मिळाली असल्याचे सटाणा येथील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सांगितले. आरम नदीच्या मळगाव पूल ते जिजामाता गार्डनपर्यंत हा नियोजित प्रकल्प असून, केंद्राकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. यामध्ये नदी संरक्षक भिंत, गंगाघाटसारख्या पायऱ्या, गणपती कुंड, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक यांचा समावेश आहे. येथील नगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासनाशी निगडित प्रलंबित विकासकामे तसेच साबरमती नदीच्या धर्तीवर नदीसंवर्धन प्रकल्पातून करावयाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीसाठी सटाणा नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिल्ली गाठली. मात्र डॉ. भामरे यांना पितृशोक झाल्याने नियोजित बैठक होऊ शकली नाही. डॉ. भामरे यांचे दिल्लीतील स्वीय सहायक साईनाथ राठोड यांच्या माध्यमातून दिल्लीतील पर्यावरण मंत्रालयात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी भेट देत सटाणा येथील आरम नदीसंवर्धन प्रकल्पाबाबत माहिती सादर केली. या दिल्ली दौºयात दीपक पाकळे, दिनकर सोनवणे, काका सोनवणे, महेश देवरे, राहुल पाटील, मनोहर देवरे, बाळू बागुल, दत्तू बैताडे, कोमल मोरकर, रमेश भामरे, आरिफ मन्सुरी, शमीम मुल्ला, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, संगीता देवरे, भारती सूर्यवंशी, निर्मला भदाणे, शमा मन्सुरी यांचा समावेश होता.
‘आरम’ नदीचे होणार संवर्धन पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी : सटाण्यातील नगरसेवक दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:13 AM
सटाणा : महाराष्ट्र राज्यातून सटाणा नगरपालिकेने सादर केलेल्या आरम नदीच्या संवर्धन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली.
ठळक मुद्देमळगाव पूल ते जिजामाता गार्डनपर्यंत हा नियोजित प्रकल्प नदीसंवर्धन प्रकल्पातून करावयाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पा