शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

आरतीचा हुंड्यासाठी खून

By admin | Published: April 08, 2017 12:50 AM

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; नव्याने तपास करण्याची मागणी

कोल्हापूर : नाशिक येथे आरती पाटील-सावकार हिचा हुंड्यासाठी खून झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणी नव्याने तपास करावा, संशयितांना व्हीआयपी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. भारतीय महिला फेडरेशनने या मोर्चाचे आयोजन केले होते. आरती हिने नाशिक येथे २ एप्रिल ला आत्महत्या केली होती. याप्रकरणी संशयितांना अटक झाली होती; परंतु सावकार परिवाराच्या दबावापोटी हा तपास नीट होत नसल्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी तीन वाजता आरतीच्या माहेरच्या परिसरातील नागरिक, विवेकानंद कॉलेज, ‘केआयटी’मधील विद्यार्थी हे मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. आरतीचा लग्नातील मोठा फोटो मोर्चाच्या अग्रभागी होता. फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा डॉ. मेघा पानसरे, सचिव ज्योती भालकर, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, आरतीचे वडील अ‍ॅड. बी. एम. पाटील, आई पूजादेवी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आरतीचा सासरी हुंड्यासाठी छळ होत होता. आरतीच्या डायरीतूनही तशी माहिती मिळाली आहे. तिचा हुंड्यासाठी खून झाल्याचा संशय असून, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत नव्याने तपास व्हावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आरतीचे सासरे आप्पासाहेब सावकार हे नाशिकमधील मोठे उद्योजक आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)संजय शिंदे यांचा थेट नाशिकला फोननिवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी थेट नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून या प्रकरणाचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले असून, संबंधितांना त्याची कल्पना देण्याची सूचना त्यांनी केली. संबंधित तपास अधिकाऱ्यांना बदलले असल्याची माहिती यावेळी शिंदेयांनी दिली.मुलींना जन्मच देऊ नकाआरतीच्या आई पूजादेवी यांनी सुखात वाढलेल्या माझ्या लेकीवर ही वेळ आली. आता मुलींना जन्म देऊ नका, असेच मी सगळीकडे सांगणार आहे, अशा शब्दांत त्रागा व्यक्त केला. मुलीला जन्म द्या म्हणून नरेंद्र मोदी सांगतात. मग अशा या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रविवारी कॅँडल मार्चआरतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी रविवारी (दि. ९) सायंकाळी कॅँडल मार्चचे आयोजन केले आहे. ‘केआयटी’च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने हा मार्च काढण्यात येणार आहे. यावेळी सर्वजण काळा शर्ट परिधान करणार आहेत. नाशिकमध्ये बॅटरी मिळत नाही का ?आरतीचे वडील अ‍ॅड. पाटील म्हणाले, कोल्हापूरला ट्रॅव्हल्सने येताना तिच्या नवऱ्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तिचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, अशी मागणी केल्यानंतर कॅमेऱ्याची बॅटरी उतरली म्हणून शुटिंग करणाऱ्याला गायब केले गेले. नाशिकमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी मिळत नाही का ? आरोपींना बाहेरून जेवणाचे डबे आणल्यावर स्वत: पोलिस अधिकाऱ्यांनी उठून त्यांना डबे नेऊन दिले. याबाबत विचारताच काही गोष्टी अ‍ॅडजस्ट कराव्या लागतात, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : चंद्रदीप नरके आरती गौरव सावकर हिच्या हत्येची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.नाशिकमध्येही निघणार मोर्चामहिला फेडरेशनची नाशिक शाखा आता तेथेही मोर्चा काढून आरतीच्या मृत्यूचा जाब विचारणार आहे. सर्व मानवाधिकार संघटनांशी आमची चर्चा सुरू असून, त्याही या लढ्यात उतरतील, असे डॉ. मेघा पानसरे यांनी यावेळी सांगितले.