नाशिक : पाच, दहा नव्हे तर तब्बल ४० नव्याकोऱ्या धारधार तलवारींचा साठा मालेगावात वाहून आणला असता पोलिसांनी सापळा रचुन तो शिताफीने हस्तगत केला. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी बाळगणाऱ्या तीघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर त्यांचा म्होरक्या सराईत गुन्हेगार हा पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरला. परराज्यांमधून इतक्या तलवारी शहरात नेमक्या कशासाठी आणल्या व यामागील काय उद्देश आहे, याचा चौहोबाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी परिसरात एका हॉटेलजवळ मंगळवारी (दि. १) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका गाडीतून धारदार शस्त्रे शहरात आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आर. के. घुगे यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. यावेळी संशयास्पद रिक्षा (एमएच४१ ए.टी ०१०७) येताच पोलिसांनी रिक्षा रोखली. रिक्षात बसलेल्या मोहम्मद आसिफ शकिर अहमद (२७,रा.मर्चंन्टनगर). इरफान अहमद हबीब अहमद (३८,रा.) अतिक अहमद सलीम अहमद (२८,रा. इस्लामपुरा)यांना अटक करण्यात आली. या तीघांचा म्होरक्या सराईत गुन्हेगार मोहम्मद मेहमूद अब्दुल राशिद हा पळून गेला. त्याच्यावर यापुर्वीही शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पाटील म्हणाले. त्याचा मागावर पथक असून लवकरच त्यालाही अटक करण्यास यश येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 20:28 IST
रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा
ठळक मुद्दे१ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त म्होरक्या सराईत गुन्हेगार पळून जाण्यास यशस्वी