येवला : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ धावत्या मारुती एस्टीम कारने अचानक पेट घेतला. गाडीत असलेल्या दोघांनी गाडी सोडून पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पेटती गाडी पेट घेईल व गाडीचा स्फोट होईल या भीतीने महमार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बीड जिल्ह्यातील माजलगांवचे येथील रहिवासी गणेश अशोक घोलप हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मारु ती कंपनीची एस्टीम कार क्र मांक एम एच-१२ सी वाय ५६०१ या गाडीने नाशिकहुन औरंगाबादच्या दिशेने जात असतांना अंदरसूल येथील लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ या गाडीने अचानक पेट घेतला.यावेळी प्रसंगावधान राखून गाडीत असलेल्या दोघांनी ही गाडी सोडून पळाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस कर्मचारी वाय. एस. खैरे यांनी तात्काळ अिग्नशमन दलाला कळवले . मात्र भर उन्हात रोडवर पेटलेली गाडी पूर्णत: जळुन खाक झाल्यानंतर उशीराने अग्निशमन दलाची गाडी घटना स्थळी पोहचली.आणि पेटलेली गाडी विझवण्यात आली. गाडी पहाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी झाली. यावेळी अर्धा तास वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तपास निरीक्षक रूपचंद वाघमारे करीत आहे. (वार्ताहर)
धावत्या कारने घेतला पेट
By admin | Published: March 03, 2017 1:13 AM