पेठ : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील तोरंगण (ह.), हरसूल, वायघोळपाडा, सारस्ते, जातेगाव, दलपतपूर, निरगुडे, चिंचवड, सापतपाली, चिखलपाडा, हट्टीपाडा येथील इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना नव्या उबदार स्वेटरचे दान फाउंडेशनतर्फेमोफत वाटप करण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यात ऊब मिळाल्याचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.विशेष म्हणजे, हरसूल परिसरातील जवळपास सर्वच खेड्या-पाड्यांवर दान फाउंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या, पाटी, पेन, पेन्सिल देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावला होता. अलीकडे वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी शालेय पटावरदेखील याचा मोठा विपरीत परिणाम होत असतो. (वार्ताहर)
थंडीच्या कडाक्यात आदिवासी विद्यार्थ्यांना ऊब
By admin | Published: November 18, 2016 11:21 PM