नाशिक : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून हे पर्यटनस्थळ साकारण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतिकारी संघटना म्हणून अभिनव भारत संघटना सुपरिचित आहे. प्लेगच्या काळात पुणे येथे सावरकर यांची म्हसकर आणि पागे यांच्याशी परिचय झाल्यांनतर त्यांनी राष्टÑभक्तांची चळवळ वाढविण्यासाठी १८९९ मध्ये राष्ट्रभक्त समूह या संस्थेची स्थापना झाली. त्याचे उघड निरूपद्रवी संघटनेचा स्थापन करण्यासाठी १ जानेवारी १९०० रोजी नाशिकमध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे काम सुरू झाल्यानंतर संघटनेचे नाव काहीसे मुळमुळीत वाटत असल्याने त्यानंतर या संघटनेचे मे १९०४ मध्ये या संघटनेचे नाव अभिनव भारत करण्यात आले. इटलीच्या मॅझिनीने स्थापन केलेल्या यंग इटलीच्या आधारे हे नामकरण त्यावेळी सावरकरांनी केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे.या वाड्याची अवस्था बिकट होत आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर सावरकर यांच्या जीवनावरील साहित्य आणि काही वस्तू तसेच अन्य नाशिकच्या क्रांतिकारकांची माहिती उपलब्ध आहे. यावाड्याची अवस्था बघता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून, आमदार देवयानी फरांदे यांनी तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला आहे. त्यानुसार वाड्याचे नूतनीकरण करताना पुरातन स्वरूप कायम ठेवण्यात येणार असून, जुन्या काळातील दगडी रस्ता साकारण्यात येणार आहे. याच सावरकर यांची ग्रंथसंपदा साहित्य याचबरोबर माहितीपटदेखील साकारण्यात येणार आहे.कान्हेरे, कवी गोविंदांवरही माहितीपट४अभिनव भारत मंदिरात सावरकर यांच्याबरोबरच जॅक्सनचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे आणि कवी गोविंद यांच्यादेखील स्वतंत्र्य खोल्या तयार करून त्यांचे साहित्य तसेच माहितीपट साकारण्याचा प्रस्ताव आहे. सदरचा प्रस्ताव दुरस्तीसह शासनाला पाठविण्यात आला असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनीदेखील त्यास अनुकूलता दर्शविल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर हे या वाड्याजवळच दातार यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. त्यामुळे सावरकर या वाड्यात राहत होते, याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी वाड्यावर फलक लावण्यात येणार असून, अशाच प्रकारे अभिनव भारतशी संबंधित सर्व क्रांतिकारकांचे वाडे शोधून तेथेही फलक लावण्याचा प्रस्ताव आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. परंतु हा वाडा पूररेषेत असल्याने महापालिका नूतनीकरणदेखील मंजूर करीत नाही. माजी महापौर अॅड. यतिन वाघ यांनी मनपाच्या वतीने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. नगरसेवक शाहू खैरे वाड्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करतात. त्याचबरोबर अनेक नागरिक सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहेत. परंतु मंजुरीमुळे हा प्रस्ताव रखडला आहे. शासनाने याबाबत पुढाकार घेऊन नूतनीकरण केल्यास चांगलेच होईल.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिवन भारत ट्रस्ट
अभिनव भारत’च्या वाड्याचे होणार पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:22 AM