लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रिव्हर साइड गोल्फ कोर्स आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोल्फ चॅम्पिअनशिप स्पर्धेत हैदराबादच्या अभिषेक मित्राने चमकदार कामगिरी करून ३२ गुणांच्या आधारे सर्वसाधारण विजेतेपदावर मोहर उमटवली, तर व्यावसायिक गटात मुंबईच्या अन्वर शेखने ४४ गुणांच्या आधारे विजेतेपद मिळविले.
व्यावसायिक गटात मुंबईच्या किरण परमारने ८३ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. नाशिकची महिला खेळाडू यालिसाईने व्यावसायिक गटात खेळताना सुंदर खेळाचे प्रदर्शन करून ८० गुणांच्या आधारे तिसरा क्रमांक मिळविला. अमॅच्युअर गटात हैदराबादचे वर्चस्व दिसून आले. या गटात खेळताना अभिषेक मित्राने ३२ गुणांसह विजेतेपद तर सिकंदराबादच्या प्रतापसिंग राणावतने ४१ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. या गटात हैदरबादच्या ब्रिगेडियर व्ही. डी. अब्राहमने ४३ गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला. नोव्हाइस गटात नाशिकच्या योगेश धोपावकरने पहिला, देवांग गुजराथीने दुसरा, तर खंडू कोटकरने तिसरा क्रमांक मिळविला. नाशिककरांसाठी असलेल्या चवथ्या गटात विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी पहिला, कॅप्टन ए. के. सूर यांनी दुसरा आणि राजीव देशपांडेने तिसरा क्रमांक मिळविला. तसेच लॉंगेस्ट शॉटमध्ये मनीष शाह (नाशिक), निअरेस्ट टू पिन (होल ) यामध्ये अन्वर शेख (मुंबई) आणि निअरेस्ट टू सेंटर लाइनमध्ये ब्रॅंडन यांची निवड करण्यात आली.
इन्फो
महिला आणि मुलांसाठीही स्पर्धा
महिला आणि मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महिलांना आणि मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आली. महिलांमध्ये पटिंगमध्ये शीतल बगमार यांनी, तर लॉंगेस्ट शॉटमध्ये रुई भांडगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मुलांमध्ये पटिंगमध्ये प्रतीक कुमावतने तर लॉगेस्ट शॉटमध्ये विभोर भांडगेने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण एअर कमोडोर देवळालीच्या विशेष सेवा मेडल पुनीत सरीन आणि एचडीएफसी बँकेचे विपणनप्रमुख संदीप आईडीन तसेच ए. के. सिंग, उत्तरवार ग्रुपचे श्री आणि सौ उत्तरवार, सर्वांगी सारीचे अपूर्व भांडगे, मेक वर्ल्ड इकोचे ध्रुवेन शहा यांच्या हस्ते झाले.