त्र्यंबकेश्वर : शहरात कोरोनाचे रुग्ण नसले तरी प्रशासनाच्या कथित तिसऱ्या लाटेच्या सावटात श्रीगणरायाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले. शहरातील सुमारे १५ नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी आरास, सजावट आदींना फाटा देत सर्व गणेश मंडळांनी अगदी साधेपणाने गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकूण १४ गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात काही गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यावर्षी सार्वजनिक मंडळांसाठी काही निर्बंध आखून दिलेले आहेत. मात्र घरगुती गणेशोत्सव उत्साहात संपन्न होत आहे. बाजारामध्ये गणेशमूर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टाॅल लागले होते. शाडूमातीच्या गणेशमूर्तींना जास्त मागणी होती. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तर काही नागरिकांनी शुक्रवारी सकाळी घंटानाद व बाप्पांचा जयघोष करीत गणेशमूर्ती घरी घेउन आले. श्रीगणेशाच्या आगमनाने वातावरणात चैतन्य भारावून गेले आहे.
त्र्यंबकला गणरायावर वरुणराजाचा अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:16 AM