नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवणभटकावे लागत आहे. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्केच साठा शिल्लक राहिला असून, हवामान खात्याने मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत दिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलसंकट उभे ठाकले आहे. मराठवाडा, नगर जिल्ह्णासह नाशिक जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहत, रेल्वे यांसह सिंचनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले. तथापि, यंदा धरणांमध्येच जेमतेम ७२ टक्के जलसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. अशातच फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊ लागले, त्यातच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडावे लागल्याने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्णातील धरणांमध्ये सरासरी १० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही नऊ धरणे कोरडीठाक पडली आहेत.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सर्वाधिक म्हणजे २४ टक्के साठा असून, त्या खालोखाल चणकापूरमध्ये १९ टक्के, करंजवणला १७, पालखेडला १३, दारणा, गिरणा धरणात दहा टक्के साठा आहे. गंगापूर धरण समूहात १६ टक्के, पालखे ड समूहात १२ टक्के, दारणा समूहात ६ टक्के, गिरणा खोºयात १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.पाण्याची काटकसरयंदा कडाक्याच्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असून, ग्रामीण भागात अगोदरपासूनच असलेल्या टंचाईने भीषण स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे काटकसरीने वापर करण्याचे आवाहन व उपाययोजना करण्यात येत आहे.आरक्षण जाहीरगेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. आॅक्टोबरपासूनच पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. तत्पूर्वी धरणांतील जलसाठ्याचे पाणी आरक्षण जाहीर झाले.
जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:33 AM