सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात शिंगवे आघाडीवर असून, गतवर्षी "लेकीच झाड" हा उपक्र म राबवत, एक आदर्श उभा केला आहे, यात कोणताही खंड पडू न देता, आजतागायत या उपक्र मांतर्गत २५-३० झाडे लावण्यात आली आहे. तर त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत होत, सध्या हे झाडे मोठ्या दिमाखात डौलत आहे. तर काही दिवसांपूर्वी नव्याने झालेल्या, शिंगवे फाटा ते शिंगवे गाव सुमारे एक-दीड किमी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण असून, बुधवारपासुन खड्डे खोदण्याची सुरु वात करण्यात आली आहे. तर, रविवारी (दि.१६) या खड्यांत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सुमारे ५०० झाडांची लागवड होत, रस्त्याच्या दुतर्फा भविष्यात झाडांची सावली शिंगवेकरांना मिळणार आहे.या उपक्र माचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून ग्रामपंचायतीच्या आवाहानाला प्रतिसाद देत, ग्रामस्थ यासाठी आपापल्या परीने झाडे देत, ग्रामपंचायतीच्या उपक्र मात सहभागी होत आहे. वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याला सुरु वात बुधवारी शिनाबाई शिंदे यांच्या हातून नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक रवी अहिरे, सरपंच शिवाजी माने, उपसरपंच धोंडीराम रायते, शंकर सानप, रामदास शिंदे, संजय डेर्ले, केदु कोरडे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.गावात नवनवीन उपक्र म राबविण्याचा नेहमीच प्रयत्न असतो, त्यासाठी ग्रामस्थही साथ देत आहे. लेकीच झाड या उपक्र माला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत, २५-३० झाडे आजपर्यंत लावले आहे. तर सध्या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या झाडांसाठीही ग्रामस्थांनी पुढाकार घेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडे देत आहे. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे.धोंडीराम रायते,उपसरपंच, शिंगवे.ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहभागातून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असल्याचा मनस्वी आनंद होत, आहे. तरु णांनी पुढाकार घेऊन, नाविन्यपूर्ण उपक्र म राबवत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे, यावर उपाय म्हणून वृक्षारोपण हा पर्याय असला तरी, संवर्धन होणे गरजेचे आहे. भविष्यात ही झाडे सावली देणारीच असतील.भगीरथ गीतेग्रामपंचायत सदस्य.(फोटो १३ शिंगवे)
शिंगवेकर रस्त्याच्याकडेला लावणार सुमारे ५०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 7:33 PM
सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकोणताही खंड पडू न देता, आजतागायत या उपक्र मांतर्गत २५-३० झाडे लावण्यात आली