नाशिक : नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगारासाठी बेरोजगारांची पावले आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे वळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात दरमहा सरासरी अडीच हजार बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीसाठी नोंदणी करीत असून, दर महिन्यात यात वाढच होत आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात तर तब्बल चार हजार बेरोजगारांनी आॅनलाइन नावे नोंदविली आहेत.दरवर्षी साधारणपणे दीड हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळावी असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी, खासगी आणि सार्वजनिक आस्थापनांमध्ये नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगार मिळविण्यासाठी बेरोजगार तरुण-तरुणींकडून नावे नोंदविली जात आहेत. शासनाच्या ‘महास्वयं’ या पोर्टलवर बेरोजगार तरुण नावे नोंदवित असून, नावनोंदणी आॅनलाइन असल्यामुळे नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. याच पोर्टलवर नोकरी, स्वयंरोजगार आणि नोंदणीची संधी असल्याने बेरोजगारांकडून या संकेतस्थळाला भेट दिली जात आहे.नाशिकमध्ये गेल्या जानेवारीपासून असलेल्या नोंदणीची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात २,२६४, फेब्रुवारीमध्ये २,९९७, मार्च महिन्यात १९२८, एप्रिलमध्ये १६२८, मेमध्ये २,१५३, जूनमध्ये २,३८३, जुलैमध्ये ३,०५२, आॅगस्टमध्ये ४,११३ तर सप्टेंबरमध्ये ३,८७२ इतक्या बेरोजगारांनी नोंदणी केलेली आहे. काही खासगी संस्थांकडून प्रशिक्षणार्थी उमेदवारांची मागणी नोंदविली जाते. प्रशिक्षण करता करता त्याच ठिकाणी नोकरीची शक्यता अधिक असल्याने तरुणांकडूनदेखील प्रशिक्षित (ट्रेनी) म्हणून काम करण्याची तयारी असते. १७ हजार डिप्लोमाधारकही रोजगाराच्या प्रतीक्षेत रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयात सप्टेंबरअखेर नोंदणी झालेल्या २ लाख १७ हजार ४३० बेरोजगारांपैकी १७ हजार ३८९ उमेदवार हे डिप्लोमाधारक आहेत. या कार्यालयात दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक आपल्या शैक्षणिक पात्रतेत जसजशी वाढ होते तस तसे आपल्या शैक्षणिक पात्रतेची आॅनलाइन नोंदणी करीत असतात. त्यानुसार सप्टेंबरअखेर डिप्लोमाधारकांची संख्या १७ हजार ३८९ इतकी असून, आयटीआय झालेल्या बेरोजगार तरुण, तरुणींची संख्या १३, ८०४ इतकी आहे. अर्थात ही आकडेवारी सातत्याने बदलणारी असते. यातील अनेकांना नोकरी लागते, तर काहींच्या शैक्षणिक पात्रततेच बदल होत असतो. रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयात नावे नोंदविलेल्या बेरोजगार युवक-युवतींना आॅनलाइन आपल्या शैक्षणिक पात्रतेत बदल करता येतो. तसेच पत्ता आणि अन्य काही माहितीदेखील बदलता येऊ शकते. नावनोंदणी तसेच माहितीत बदल करावयाचा असेल तर उमेदवाराला कार्यालयात येण्याची गरज नसते. त्यामुळे बेरोजगार म्हणून नोंदणी करणाºयांची संख्या आॅनलाइनमुळे वाढल्याचे दिसते.बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून आस्थापनांचा शोधबेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळावी म्हणून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापनेला आपल्या कार्यालयातील कर्मचाºयांची मंजूर संख्या आणि प्रत्यक्षात भरलेल्या कर्मचाºयांची संख्या यांची माहिती रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. मात्र याबाबतची माहिती कोणत्याही आस्थापनेकडून दिली जात नाहीच शिवाय याबाबतचा आग्र्रहदेखील धरला जात नाही.४या कायद्यानुसार संबंधित आस्थापनेकडून माहिती दडविण्यात आली असेल तर संबंधितांना दंड आकारला जाऊ शकतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत. त्यामुळे अशा आस्थापनांचा शोध येथील कर्मचाºयांना घ्यावा लागतो. २५ पेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या कारखानदार मालकाला रोजगार कार्यालयाला माहिती कळवावी लागते. परंतु अशाप्रकाची माहिती जाणूनबुजून देण्याचे टाळले जाते. दरमहा केवळ १८ ते २० इतकेच आस्थापना नियमित माहिती पाठवित असतात. दरमहा १६ हजार २०० नोकºया देण्याचे लक्ष्य४सेवायोजन कार्यालयाची व्याप्ती वाढून रोजगार व स्वयंरोजगार असे करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे कामदेखील रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाला करावे लागते.४दरमहा किमान १६,२०० बेरोजगारांना नोकरी मिळावी असे लक्ष्य आहे. मात्र नोकरी देणे किंवा भरती काढणे, उमेदवारांची निवड करणे हे सर्वस्वी संबंधित आस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळे रोजगाराचे लक्ष्य असले तरी प्रत्यक्षात रोजगार देण्याबाबतचे अधिकार या कार्यालयाकडे नसल्यामुळे लक्ष्य पूर्ण होतोच असे नाही.४दरमहा १,६२० बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळवी असे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागणाºयांची संख्या ६५०च्या जवळपास आहे.
दरमहा अडीच हजार बेरोजगारांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:31 AM
नाशिक : नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगारासाठी बेरोजगारांची पावले आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे वळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात दरमहा सरासरी अडीच हजार बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीसाठी नोंदणी करीत असून, दर महिन्यात यात वाढच होत आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात तर तब्बल चार हजार बेरोजगारांनी आॅनलाइन नावे नोंदविली आहेत.
ठळक मुद्देनाशिकमधील परिस्थिती : रोजगार कार्यालयात आजवर सव्वादोन लाख बेरोजगारांच्या नोंदी