मनमाड : नाशिकच्या सराफा दुकानावर दरोडा टाकत पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वेस्थानकावर जेरबंद करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाचा नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. वर्दीच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या रेसुब कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे.नाशिक दरोडा प्रकरणातील दोन दरोडेखोर पोलिसांवर गोळीबार करून मोटारसायकलने पळून गेले होते. मनमाड येथून ते रेल्वेने नांदेडकडे जाण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांच्यासह के. सिंग, आर. एम. शिंदे, ए.एन. देवरे, डी. के. तिवारी, बी.बी. चव्हाण, एस.एस. घाटोले, शाबीर शहा, सुरेंद्र्र कुमार, संतोष जायभावे आदींच्या पथकाने तातडीने रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला. त्यांना फलाट क्रमांक सहावर दोन्ही आरोपी आढळून आले. रेसुब कर्मचाºयांना पकडण्यासाठी गेले असता दरोडेखोरांनी पलायन केले. मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात आले. रेसुबने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन नाशिकचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी रेसुब निरीक्षक के.डी. मोरे व त्यांच्या पथकाचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
नाशिक सराफा दरोड्यातील फरारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:01 PM
मनमाड : नाशिकच्या सराफा दुकानावर दरोडा टाकत पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वेस्थानकावर जेरबंद करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाचा नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. वर्दीच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या रेसुब कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे.
ठळक मुद्देमनमाड : रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी; वरिष्ठांकडून शाबासकीची थाप