लोहोणेर : गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावात विकासकामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून, गावात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. विकासकामे करावयाचे नसतील तर खुर्ची खाली करा अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या सदस्य धनश्री आहेर यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार यांची कानउघडणी केली.यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कल्पना देशमुख, प्रसाद देशमुख, समाधान महाजन, निबा धामणे, राकेश गुळेचा, योगेश पवार, आदींनी चर्चेत सहभाग घेत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभारा विषयी तक्रारी केल्या. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य यांना कळवूनही याबैठकीस हजर नसल्याने धनश्री आहेर यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. केदा आहेर, गटविकास अधिकारी महेश पाटील, विस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत, सतीष देशमुख, रमेश आहिरे, अशोक अलई, प्रकाश नेरकर, नाना जगताप, सोपान सोनवणे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान धनश्री आहेर यांनी लोहोणेर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रास भेट देऊन कामकाजा बाबत सूचना केल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, लोहोणेर प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. योगेश पवार आदीसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लोहोणेर प्राथमीक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या जागी नवीन कर्मचाºयांची त्वरीत नेमणूक करण्यात यावी अशी मागणी लोहोणेर ग्रामस्थांनी केली.लोहोणेर येथे स्वाइन फ्लू आजाराने राजेंद्र परदेशी या प्रगतिशील शेतकºयाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर धनश्री आहेर यांनी शनिवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.