ग्रामीण भागात लॉकडाऊनमुळे शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य घरी असल्याने शेतीची कामे उरकती घेत आहेत. अनेक कुटुंबे शेती कामात रमली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट आली आहे. सध्या जळगाव नेऊर परिसरात शेतीमध्ये रब्बी हंगामातील कांदा काढणी, कांदा चाळीत भरणे ही कामे सुरू आहेत. तर काही शेतकऱ्यांनी नांगर धरला आहे तर काहींनी पिके काढून खरीपासाठी शेती तयार करण्याची कामे सुरू केली आहेत. रब्बी पिकाच्या काढणीनंतर शेती नांगरणी, शेणखत पसरवणे, ही कामे लाॅकडाऊनमुळे सर्व शेतकरी घरी असल्याने एक महिनाभर अगोदर होत असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामे करीत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने मजूर कामावर येत नसल्याने अनेक कुटुंबे घरच्या घरीच कांदा साठवणूक करत असून यावर्षी कांदा उत्पादनात मोठी घट आली आहे.
-----------
जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली उन्हाळ कांदा साठवणूक. (२८ जळगाव नेऊर)
===Photopath===
280421\28nsk_23_28042021_13.jpg
===Caption===
२८ जळगाव नेऊर