शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लॉकडाऊनमध्येही समृद्धीच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:14 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे कारागीर तसेच मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने काही प्रमाणात काम मंदावले असले तरी कामात खंड पडलेला नव्हता. यंदाची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली असून येथील कामाने गती घेतली आहे. नियमित कोरोना चाचणी करण्याबरोबरच सुरक्षितता नियमांचे पालन करून कामकाज सुरू असल्यने काम बऱ्यापैकी पुढे सरकले आहे.

मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.६८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाेगदा या मार्गावर तयार होत आहे. सध्या ३ किलोमीटरच्या पुढे बोगद्याचे काम सरकले आहे. राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यांमधून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. या महामार्गाचे १ ते १६ असे टप्पे असून नाशिक जिल्ह्यातील बोगद्याचे काम हे १४ व्या टप्प्यात सुरू आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या मार्गावर दोन डोंगरांना जोडणारा सर्वात मोठा पूल तयार होत आहे तर दुसरा सर्वात उंच पूलदेखील असणार आहे.

बोगद्याची उंची ९.१२ मीटर तर रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे. डाव्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८ मीटर लांबीचा तर उजव्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७४ मीटर लांबीचा आहे. या बोगद्यामुळे कसारा घाट सात मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवासदेखील कमी होणार आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे येथील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा देशभरात लॉकडाऊन नसल्याने मजुरांचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता वाढली होती. त्यावर मात करीत सर्व खबरदारी घेत येथील कामकाज सुरूच ठेवण्यात आले. दरमहिन्याला कोरोना चाचणीचा कॅम्प घेतला जातो. आरोग्याची तपासणी करून कामगारांच्या कामाचे नियोजन केले जात आहे.