सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.पाऊस वेळेवर पडल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि पेरणी योग्य वेळेत होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा जोरदार पाऊस होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी नगदी पिकांकडे कल वाढविलेला दिसत असला तरी कोरोनाच्या भीतीमुळे तयार झालेले पीक बाजारात विकता येईल की नाही किंवा बाजार समित्या वेळेवर चालू राहतील की नाही याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये मात्र कायम आहे.अनेक वर्षांपासून जून महिन्यामध्ये फारसा पाऊस पडत नाही, जुलै महिन्यात सुरू होणारा पाऊस पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबरला जोरदार पडत होता. त्यामुळे खरीप पिकांची लागवडदेखील जुलै-आॅगस्ट महिन्यात खºया अर्थाने सुरू होत असे, यंदा मात्र जून महिना सुरू होताच पावसाने दमदार हजेरी लावली आणि सगळ्याच भागांमध्ये मुबलक पडल्याने विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी-नाले तुडुंब भरले आहेत. ओढ्यांना पहिल्या पावसात खळखळ पाणी वाहत आहे. त्यामुळे खरीप हंगामात काढल्या जाणाºया पिकांना पाण्याची चणचण जाणवणार नाही म्हणून अनेक शेतकºयांनी नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.तालुक्यांमध्ये खरीप हंगामात सर्वात महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाºया टमाटे पिकाच्या लागवडीसाठी शेतकºयांनी तयारी सुरू केली आहे. कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, वांगी, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली असून, अशी पिके उभी करण्यासाठी शेतकºयांना प्रचंड प्रमाणामध्ये भाग भांडवल खर्च करावे लागत आहे.खरीप हंगामातील पिकांची जोरदार लागवड सुरू असली तरी भविष्यात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने विक्र ीसाठी प्रचंड अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये कायम आहे. एकंदरीत शेतकरी आपले सर्व दु:ख विसरून उमेदीने शेतात पिकांची उभारणी करीत आहे.
पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 5:49 PM
सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.
ठळक मुद्देखरीपाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज; कोरोनामुळे विक्र ीची भीती कायम