देवळा : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दौलत शिंदे यांनी दिली आहे. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्यात आॅक्टोबर २०१८ नंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून त्यांना नुकसान सोसावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या/खासगी बाजार समितीमध्ये दि. १ नोव्हेंबर २०१८ ते दि. २८ फेब्रवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना २०० रु पये प्रतिक्विंटल व प्रति शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकºयांना कांदा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत अनुदान मागणीचे अर्ज त्यांनी कांदा विक्र ी केलेल्या बाजार समितीत जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागले. कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत व राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक होते; परंतु अनेक शेतकºयांना तांत्रिक अडचणींमुळे सातबारा उतारा वेळेवर उपलब्ध झाला नाही. यामुळे हे शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहिले होते; परंतु दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकरी बांधवांनी आपले अर्ज विहित मुदतीत देवळा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह वेळेत जमा करावेत.- कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा.
कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 5:07 PM
देवळा : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दौलत शिंदे यांनी दिली आहे. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देदि. १ नोव्हेंबर २०१८ ते दि. २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत देवळा बाजार समितीमध्ये विक्र ी केलेल्या कांदा शेतमालाचे अनुदान अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीस १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.