ओझर टाउनशिप : चांगल्या व्यक्तींच्या सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगुणी व्यक्तींच्या दुर्गुणांना सोडून देण्याची शिकवण देण्यासाठी श्रीगुरु देव दत्तात्रयांनी २४ गुरु केले. ‘ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’.भाविकांनीदेखील प्रत्येक व्यक्तीमधील चांगला गुण घ्यावा, आणि दुर्गुण असेल तर सोडून द्यावा. असे केल्यास हे सर्व जग गुरु मय दिसेल आणि आपले जीवन आनंदी-समाधानी होईल, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले. जय बाबाजी भक्त परिवाराचे आश्रम असलेल्या ओझर येथील जनशांतिधाम येथे दत्तजयंती पौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, महाआरती, सत्संग, प्रवचन आश्रमात स्थापन करण्यात आलेल्या श्रीदत्तात्रय मूर्तीचे ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अभिषेक-पूजन झाले. विविध भक्तिगीते, पाळणा गीत गाऊन श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना अनंत विभूषित श्रीसंत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले-वाईट गुण असतात; मात्र काय घ्यायचे ते आपल्या हातात असते.भाविकांकडून व्यसनमुक्तीचा संकल्पव्यसनाच्या विविध पुड्यांची होळी करण्यात आली. जनशांतिधामातील देवी-देवता आणि परमपूज्य बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांकडून व्यसनमुक्तीचा संकल्प करून घेण्यात आला. चांगले गुण आत्मसात करावे आणि दुर्गुणांचा त्याग करावा. असे सांगतानाच श्री दत्तात्रेय भगवंतांनी केलेल्या चोवीस गुरुंची माहिती यावेळी यांनी दिली. प्रत्येक व्यक्तीला ‘शिक्षा’ गुरु अनेक असू शकतात; मात्र ‘दिशा’ एकच असते, असेही त्यांनी सांगितले.
चांगल्या गुणांचा स्वीकार करा, अवगुणांचा त्याग करा : शांतीगिरी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:49 PM
चांगल्या व्यक्तींच्या सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगुणी व्यक्तींच्या दुर्गुणांना सोडून देण्याची शिकवण देण्यासाठी श्रीगुरु देव दत्तात्रयांनी २४ गुरु केले. ‘ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’. भाविकांनीदेखील प्रत्येक व्यक्तीमधील चांगला गुण घ्यावा, आणि दुर्गुण असेल तर सोडून द्यावा. असे केल्यास हे सर्व जग गुरु मय दिसेल आणि आपले जीवन आनंदी-समाधानी होईल, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
ठळक मुद्देओझर येथील शांतिधाममध्ये दत्तजयंती पौर्णिमा उत्सव