शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नवीन आव्हानांचा स्वीकार करा : सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:26 PM

नाशिक : जीवन हे क्षणभंगूर असून, कोणावरही विसंबून न राहता ते परिपूर्णतेने जगा, जीवनातील ध्येय व विचार उच्च असतील तर फायदाही निश्चितच मोठा असतो़ ध्येयसिद्धी करताना कितीही अडथळे, अपयश आले तरी थांबू नका पुढे चालत राहा़ जीवनात नवनवीन ध्येय, आव्हांनाचा स्वीकार करून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहा यश हे निश्चित मिळेल, असे प्रतिपादन फ्रान्समधील आयर्नमॅन स्पर्धेचे विजेते तथा शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी लोकमततर्फे आयोजित सत्कारप्रसंगी केले़

ठळक मुद्दे‘आयर्नमॅन’ सिंगल यांचा लोकमततर्फे भव्य सत्कार

नाशिक : जीवन हे क्षणभंगूर असून, कोणावरही विसंबून न राहता ते परिपूर्णतेने जगा, जीवनातील ध्येय व विचार उच्च असतील तर फायदाही निश्चितच मोठा असतो़ ध्येयसिद्धी करताना कितीही अडथळे, अपयश आले तरी थांबू नका पुढे चालत राहा़ जीवनात नवनवीन ध्येय, आव्हांनाचा स्वीकार करून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहा यश हे निश्चित मिळेल, असे प्रतिपादन फ्रान्समधील आयर्नमॅन स्पर्धेचे विजेते तथा शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी लोकमततर्फे आयोजित सत्कारप्रसंगी केले़

फ्रान्समध्ये २६ आॅगस्ट रोजी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत ४ कि.मी. पोहोणे, १८० कि.मी. सायकलिंग व ४२ कि.मी. धावणे असे अंतर निर्धारित वेळेत सिंगल यांनी पार केल्याने त्यांना आयर्नमॅन या किताबाने गौरविण्यात आले. आयर्नमॅनचा किताब पटकविणारे सिंगल हे तिसरे भारतीय असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि नाशिकच्या नावलौकिकात भर पडली आहे़ डॉ़ सिंगल हे फ्रान्सवरून परतल्यानंतर हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये लोकमततर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी बोलताना सिंगल यांनी सांगितले की, वेळेची अडचण सर्वच सांगतात, पण प्रत्येकालाच २४ तास मिळतात, त्याचा सदुपयोग कसा करायचा याचे नियोजन त्याने करणे गरजेचे असते़ तसे केले तर वेळ नक्की काढता येतो़

मनात नकारातमक विचार कधीही येऊ देत नाही, जीवनातील प्रत्येक आव्हाने स्वीकारतो व त्यादृष्टीने वाटचाल करतो म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो़ दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी तसेच कायमस्वरूपी आपली छाप रहावी, असे कार्य करण्याचे आवाहन सिंगल यांनी केले़ लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक यांनी डॉ़सिंगल यांचे विविध उपक्रमांबाबत माहिती दिली़ पोलीस आयुक्त डॉ़रवींद्र सिंगल यांच्याशी लोकमत टाइम्सचे मुख्य उपसंपादक हिमांशू नितनवरे यांनी संवाद साधला़

द्वितीय सत्रात लोकमतच्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी रवींद्र सिंगल, त्यांचे पिताश्री निवृत्त पोलीस अधिकारी जिलेसिंग सिंगल, मातोश्री कांतादेवी सिंगल व मुलगी रविजा सिंगल परिवाराशी संवाद साधला़ त्यामध्ये रवींद्र सिंगल यांचा प्रवास, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी घेतलेली कठोर मेहनत, मुलगी रविजाने दिलेली मोलाची साथ हा प्रवास उलगडला गेला़पराभवाने खिन्न न होता, रडून घेतले म्हणजे डोळ्यांपुढील पुढचे उद्दिष्ट स्पष्ट दिसू लागते, असे यावेळी रविजाने सांगून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या़ यावेळी डॉ़ कुणाल गुप्ते, अपूर्वा जाखडी यांच्यासह उपस्थितांनीही त्यांना प्रश्न विचारून संवाद साधला़

यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, उद्योजक जयेश बाफणा, प्रकाश लढ्ढा, दीपक चंदे, मीनल चौधरी, जनार्दन बेलगावकर,अनिल बूब, प्रेम नंदवानी, प्रवीण खाबिया, बी़ बी़ रायते, अरुण काबरे, विकास शेलार, विनोद शहा, अविनाश आव्हाड, अस्मिता दुधारे ,किरण चव्हाण, डॉ क़ुणाल गुप्ते, डॉ़ संजय आहेर, डॉ़ प्रविण केंगे, डॉ़ मंगेश जाधव, डॉ़ शाम पाटील, विनायक बिल्डिकर, शेखर जोशी, रवी पगारे, नवीन गाला, विक्रम उगले, प्रमोद परशरा पुरिया, अमित रोहमारे, सुनील गवांदे, योगेश पवार, जयंत येवला, डी़डी़ शिंदे, महेंद्र नंदवाणी, अजित चौधरी, अविनाश आव्हाड, अ‍ॅड़ वैभव शेटे, उज्जल चांडक, अश्विनी पेंढारकर, श्रद्धा नालमवार, तन्वी पटेल, आकांक्षा पाखले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते़‘लोकमत - महामॅरेथॉन’मध्ये यावर्षीही सहभागनाशिककरांच्या सृदृढ आरोग्याची काळजी घेणारी ही महामॅरेथॉन म्हणजे लोकमतची भविष्यातील विचार प्रकट करतो़ स्पर्धेदरम्यान, पाणीपुरवठा, हेल्थ ड्रिंक या सुविधा म्हणजे उत्कृष्ट नियोजनाचे प्रतीकच होत्या़ महाराष्ट्रातील चार ठिकाणी झालेल्या या स्पर्धेतील मेडल एकत्र केल्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा (सर्किट मेडल) तयार होतो, ही कल्पना अतिशय सुंदर होती़ गतवेळीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता तसेच यावर्षीच्या स्पर्धेतही सहभाग घेणार असल्याचे आयुक्त सिंगल यांनी सांगितले़

आयर्नमॅननंतर एव्हरेस्टविदेशातील अतिशय खडतर असा आयर्नमॅन किताब जिंकला आता पुढील उद्दिष्ट काय असा प्रश्न अपूर्वा जाखडी यांनी विचारला असता सिंगल यांनी जीवनात नेहमी उद्दिष्ट असणे गरजेचे असते़ आयर्नमॅननंतर ‘रेस क्रॉस ए अमेरिका’ त्यानंतर माउंट एव्हरेस्ट शिखर पार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले़ जीवनात ध्येय नसेल तर जीवनाला अर्थ नसल्याचे सिंगल यावेळी म्हणाले़

आयुक्त सिंगल यांनी दिल्या टिप्स* दररोज सकाळी एक ते दोन तास स्वत:साठी जरूर द्या़* कोणतेही डाएट फॉलो न करता स्वत: वेळपत्रक बनवा़* सकारात्मक विचार ठेवा़* जीवनातील ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करा़* अपयशाने खचून जाऊन थांबू नका़* यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सुरू ठेवा़ 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक