नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) सकाळी १० वाजेच्या ठोक्यालाच पालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे पोहोचले आणि पहिल्याच दिवशी आपल्यातील वक्तशीरपणाचे दर्शन घडवले. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी तातडीने प्रमुख अधिकाºयांसह सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आणि आपले मनसुबे स्पष्ट केले. अधिकारी-कर्मचाºयांनी जनतेप्रती संवेदनशीलता, कार्यपद्धतीत नियमितता व शिस्तप्रियता राखत शहराच्या शाश्वत विकासावर भर देण्याची सूचना त्यांनी बैठकीत बोलताना केली. महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीला सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सांभाळणारे तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले होते. परंतु, वेळ निश्चित नव्हती. मात्र, राजीव गांधी भवनमध्ये बरोबर दहाच्या ठोक्याला मुंढे यांचे वाहन पार्क झाले आणि सुरक्षारक्षकांपासून कर्मचारी-अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली. मुंढे यांनी मुख्यालयात प्रवेश करत असतानाच आसपासच्या दालनांची माहिती घेतली. महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते बंद करण्याची सूचना केली, तर लगतच पाणीगळती होत असल्याचे पाहिल्यानंतर त्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. दालनात आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी लगेचच अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची तातडीने बैठक बोलाविली.
आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिकाºयांसमवेत बैठक तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:53 PM
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) सकाळी १० वाजेच्या ठोक्यालाच पालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे पोहोचले आणि पहिल्याच दिवशी आपल्यातील वक्तशीरपणाचे दर्शन घडवले.
ठळक मुद्देवक्तशीरपणाचे दर्शनअधिकारी वर्गाची धावपळ सुरू