नांदगाव : पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणात दप्तर तपासणी व त्याचा चांगला अभिप्राय नोंदविण्यासाठी कारकुनाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या स्थानिक लेखापरीक्षण विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक संजय रघुनाथ बुरकूल व शिपाई राजेंद्र पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपूर्वीच वीज वितरण विभागाच्या कनिष्ठ महिला अभियंत्याकडून लाच स्वीकारताना मनमाड येथील कार्यकारी अभियंता सापळ्यात अडकला होता. त्यामुळे प्रशासनातील सध्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभारात या घटनाक्र माने पुन्हा एकदा भर पडली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तक्रारदार कारकुनाकडे पाणीपट्टीच्या हिशेबाच्या अनुषंगाने सध्या लेखापरीक्षण सुरू आहे. मात्र चांगला अहवाल व अभिप्राय हवा असेल तर पैसे लागतील, असे कनिष्ठ लेखापरीक्षक संजय बुरकूल यांनी सांगितले. यावर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कारकून राजेंद्र गरुड यांनी नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्र ार केली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. सोमवारी दुपारी पालिकेच्या शिपाई असलेल्या राजेंद्र रतन पाटील यांच्याकडे पैसे द्यावे असे बुरकूल याने सांगितले. त्यानुसार शिपाई पाटील याने पैसे स्वीकारले व तो ते पैसे बुरकूल याला देत असताना पालिका कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ पकडले. यामुळे पालिका कार्यालयात एकच धांदल उडाली. गेल्या आठवड्यातील नांदगावमधील लाच स्वीकारण्याची हि दुसरी घटना आहे . नांदगांव नगरपालिका कार्यालयात राजेंद्र पाटील या शिपायाने १० हजार रु पये स्वीकाले त्या पैशांची मागणी संजय बुरकुल यांनी केली होती . त्या वरु न य दोघांना नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शंकर कांबळे, पोलीस हवालदार सुभाष हांडगे,राजु गिते व पवार यांनी पकडले.
दहा हजारांची लाच स्वीकारताना लेखापरीक्षकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:49 AM