अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्यास विरोध का?नाशिक शहरात गंगापूररोड आणि नाशिकरोडसारख्या काही भागांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात झाडे रस्त्यात आता आली आहेत आणि ती वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रस्त्यात झाड आल्याने अपघात का होतात, याचे मूळ कारण शोधले पाहिजे. रस्त्यात येणाºया झाडांवर रात्री चकाकणाºया फ्लोरोसंट कलरने पेंट केले पाहिजे. तर ते नागरिकांच्या लक्षात येते. परंतु तसे होत नाही. मनपाने झाडांवर रिफ्लेक्टर आणि टायर खिळे ठोकले आहेत. त्याचा अपघात टाळण्यासाठी उपयोग तर होत नाहीच उलट खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी होत आहेत. त्यामुळे झाडांवर आदळून मृत्यू पावण्याच्या घटनेस झाडे दोषी नसून मनपाचा गलथानपणा कारणीभूत आहे.माणसांपेक्षा झाडे महत्त्वाची आहेत काय?रस्त्यात सध्या असलेली काही प्रजातीची झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. न्यायालयाने असे आदेश का दिलेत ते समजावून घेतले पाहिजे. महापालिका झाडे हटविते, मात्र कायद्याने बंधनकारक असतानाही रस्त्याच्या कडेला झाडे लावत नाही. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो त्यांच्याबरोबर माझ्यासह नाशिक कृती समिती सहवेदना आहेत. परंतु झाडांमुळेअपघात होतात हा गैरसमज दूर केला पाहिजे. झाडांमुळे होणाºया अपघातांपेक्षा भरधाव वेगानेधावणाºया वाहनाने पादचाऱ्यांना उडवल्याने अशा अपघातात बळी पडणाºयांची संख्या अधिक आहे.याचा विचार केला तर झाडांमुळेच अपघात होतात असे म्हणण्याततथ्य नाही.प्रत्येक झाडाला जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. परंतु झाडांना बोलता येत नाही म्हणून सर्रास झाडांना दोष दिला जातो. ५० वर्षांच्या एका देशी झाडाची शास्त्रीय किंमत साडेतीन कोटी आहे. त्याचे पर्यावरणीय महत्त्व वेगळेच. मनपा ब्लॉक प्लॅँटेशन करते हे चांगलेच, परंतु वृक्षतोड करताना त्याच वृक्षाचे पुनर्राेपणही करावे.झाडे तोडण्यात स्वारस्य, पण..शहरासाठी झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु तसे घडत नाही. लावलेली झाडे तोडण्यात मनपा तत्परता दाखविते मात्र कायद्यानुसार रस्त्याच्या कडेला दर दहामीटर अंतरावर दहा फूट उंचीची झाडे लावणे बंधनकारक आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्याचे रूंदीकरणासाठी झाडे तोडल जातात, परंतु रूंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या खासगी मिळकती ताब्यात घेतल्या जात नाही. झाडे तोडून रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यापेक्षा झाडे ठेवून पार्किंग केली तर वाहने सावलीत राहतील.
वृक्षांमुळे नव्हे मनपाच्या गलथानपणाने अपघात - भट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:48 AM