चौकट -
सन २०१८-१९ मध्ये दाखल झालेले प्रस्ताव
रस्ते अपघात = ११०
विजेचा अपघात -११५
उंचावरून पडलेले, पाण्यात पडलेले - ४०
इतर किरकोळ अपघात - २०
चौकट-
सर्वाधिक प्रकरणे रस्ते अपघाताची
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत लाभ मिळविण्यासाठी सर्वाधिक प्रकरण रस्ते अपघाताची असून, त्याखालोखाल विहिरीत पडून मृत्यू किंवा उंचावरून पडून मृत्यू झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे.
चौकट-
अपघातात शेतकऱ्याचा जर एक अवयव कायमचा निकामी झाला तर एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाले तर दोन लाख आणि अपघातात मृत्यू झाला तर दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळते. मागील वर्षापासून शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली असून, शेतकऱ्याबरोबरच कुटुंबातील एका व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.