पेठ -तालुक्यातील कोटंबी घाटात एका वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रकच्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून गुजरात महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शनिवार (दि.१४)रोजी पहाटे गुजरातकडून येणारा ट्रक क्र मांक डीएन-०९-एन-९०४० कोटंबी घाटातील वळणावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या धक्क्यावरून खाली गेला. यामुळे वाहनातील साहित्य उतारावरून घरंगळत खाली गेले. घटनास्थळापासून जवळच एक निवासी घर असून सुदैवाने ट्रक धक्क्याला अडकल्याने पुढील अनर्थ टळला. नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्गाचे रु ंदीकरणाचे काम सुरू असून संत गतीने होणारे काम आणी पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कोटंबी घाटात अपघात, अवजड ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:28 PM