चांदवड- तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई आग्रारोडवर णमोकार तीर्थक्षेत्रासमोर सोमवार दि .१८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार व कंटेनर यांच्यात अपघात होऊन कारमधील चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये धुळे येथील नगरसेवक किरण आहिरराव यांचा समावेश आहे.
या अपघातामध्ये कृष्णकांत चिंधा माळी,(रा.मोघन,ता जि- धुळे),अनिल विष्णू पाटील व प्रवीण मधुकर पवार (दोघे रा.अवधान, धुळे) हे अन्य तिघेही मृत झाले आहेत. हे सर्वजण नाशिकहून धुळ्याकडे जात होते. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वडनेरभैरव पोलिस व सोमाटोल कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.