मुळाणे (ता.बागलाण) येथील जगन्नाथ खेताडे यांचे मावसभाऊ चिंतामण नाडेकर यांच्या मुलाचा गेल्या शुक्रवारी विवाह झाला होता. विवाहानंतर चाळीसगाव येथे माहेरी पहिल्या मुळसाठी गेलेल्या नवरी मुलीला परत आणण्यासाठी मंगळवारी सकाळी सात वाजता मुळाणे येथून जगन्नाथ खेताडे (५०), त्यांची पत्नी पार्वताबाई जगन्नाथ खेताडे (४५), रुपाली शांताराम नाडेकर (३०), परशराम विठ्ठल खेताडे (४०) हे चौघे मारुती सुझुकी सेलेरियो (क्र.एम.एच. ४१ ए.झेड. ८०१५) कारने चाळीसगावकडे निघाले होते. सटाणा– मालेगाव राज्य महामार्गावरील आराई फाट्यानजीक असलेल्या हॉटेल आशा गार्डनसमोर मालेगावकडून सटाणा शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू कंटेनरने (क्र. के.ए. ०१ ए.एम. ०७७१) मारुती सुझुकी सेलेरियो वाहनाला जोरात धडक दिली. अपघातात जगन्नाथ खेताडे व त्यांची पत्नी पार्वताबाई खेताडे हे दोन्ही जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या रुपाली नाडेकर व परशराम खेताडे यांना तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले. अपघातात मारुती वाहनाचा चेंदामेंदा झाला होता. मारुती वाहनातील मृत आणि जखमींना दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले.
परिसरातील शेतकरी नीलेश सोनवणे, अनिकेत सोनवणे, सचिन अहिरे, जितू पाटील यांनी याकामी मदत केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारांसाठी हलविले. मृत पती-पत्नीवर मुळाणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मुळाणे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, अतुल अहिरे, विक्रम वडजे करत आहेत.
फोटो : २६ जगन्नाथ खेताडे व २६ पार्वताबाई खेताडे
===Photopath===
260521\26nsk_31_26052021_13.jpg~260521\26nsk_32_26052021_13.jpg
===Caption===
जगन्नाथ खेताडे~पार्वताबाई खेताडे