चांदवड /वडाळीभोई /सोग्रस - चांदवड तालुक्यातील शेलु गावाजवळ गुरु वारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिकअप गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात १९ जण जखमी झाले आहेत.कळवण तालुक्यातील बिजोटे, कनाशी, मेशी, मोकभणगी गावातील भाविक पिकअप गाडीने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. (पान ७ वर)अपघातात दोन जण जागीच ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. मृतात हरीचंद्र धुळाजी पवार ( ७०) करमाळे ता. कळवण, अक्काबाई काळु पवार (४०) मोकभणगी मेशी यांचा समावेश आहे. हे भाविक चांदवड तालुक्यातील भुत्याणे येथे देवी दर्शन व खंडेराव महाराज यात्रेसाठी जात असतांना हा अपघात घडला. जखमीत वैशाली संदीप पवार (१३), सोन्याबाई नथुराम सोनवणे (४५), काळु धुळाजी पवार (४५) अनिल पंढरीनाथ गांगुर्डे (१०), पार्वताबाई भालचंद्र पवार (६८), रोशन दादाजी माळी ( ६ ), जन्याबाई दादाजी माळी (५०) काल्याबाई आनंदा सोनवणे (५०) मोतीराम काळु सोनवणे (५५) , श्रावण सुरेश गांगुर्डे (२१) सर्व रा. मोकभणगी ता. कळवण यांचा समावेश आहे. त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले. वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात नंदा पवार (३०), राधा गांगुर्डे (५०), दादाजी कुवर (२८), लता कुवर (३०), युवराज पवार (३०), लक्ष्मी पवार (४०), दिदी पवार (५), साक्षी पवार (५०),गोकुळ कुवर (३), सर्व रा. बिजोरे विसापुर मेशी ता.कळवण यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनास्थळी वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन इमले व सहकारी दीपक तनपुरे, सतीष पवार, अशोक पवार यांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णवाहीकेने चांदवड , वडाळीभोई शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत. अन्य अपघात सोग्रस ता. चांदवड गावाजवळ झाला इन्वोहा क्रमांक डी.एन. ०९ एच. ९७५७ ने मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिल्याने या धडकेत मोटारसायकल चालक धनराज अहिरे (३०) रा. सोग्रस हा गंभीर जखमी झाला. त्यास आधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
शेलुजवळ अपघात; दोन ठार
By admin | Published: February 25, 2016 11:44 PM